व्हॉट्सअॅप अकाऊंटच्या स्टेटसवर मुघल बादशाह औरंगजेबाचा फोटो शेअर करून त्याचे उद्दात्तीकरण करणारा मजकूर शेअर करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी, या मागणीसाठी कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याचे ७ जून रोजी पाहायला मिळाले. असे स्टेटस ठेवणाऱ्यांवर कारवाईची मागणी करत विविध संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक दिली होती. त्यानुसार कोल्हापुरातले सर्व व्यवहार ठप्प होते. तसेच अनेक संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलनही केले. काही ठिकाणी जमाव प्रक्षुब्ध झाल्याने पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. या घटनेवर राज्यभरातून तीव्र पडसाद उमटत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील याप्रकरणी आपली भूमिका मांडली आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले, लोकांना दंगली नको आहेत. परंतु आम्ही हिंदू म्हणून असल्या घाणेरड्या गोष्टी खपवून घेणार नाही. आम्ही प्रसारमाध्यमांद्वारे नम्र इशारा देतोय की, असले प्रकार थांववा. या नम्र इशाऱ्यानंतर ऐकले तर ठिक नाहीतर आम्हाला आमच्या पद्धतीने इशारे देता येतात. रस्त्यावर उतरायची वेळ आली तर आम्ही उतरू, त्यानंतर होईल ते होईल. महाराष्ट्र सरकारने त्यांचा बंदोबस्त करावा नाहीतर आम्ही त्यांचा बंदोबस्त करायला सक्षम आहोत.
(हेही वाचा कोल्हापुरातल्या हिंसाचाराप्रकरणी छत्रपती संभाजी महाराजांचे परखड ट्वीट; म्हणाले….)
देशपांडे यांनी कोल्हापुरातील घटनेवर संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, ज्या लोकांचे औरंगजेबावर प्रेम आहे त्यांच्या पार्श्वभागावार लाथा घाालायला हव्यात. औरंगजेबाला जिथे पुरले आहे, तिथे यांनाही पुरायला पाहिजे. त्याचबरोबर ज्या लोकांनी व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवले होते, त्यांच्यावर पोलिसांनी कडक कारवाई करायला हवी. त्यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांवर लाठीचार्ज कसला करता. अशी अॅक्शन झाल्यावर त्यावर रिअॅक्शन येणारच. हिंदूंकडून अशी प्रतिक्रिया येणं सहाजिक आहे.
Join Our WhatsApp Community