Shivsena Dasara Melava: शिवरायांची शपथ घेऊन सांगतो की… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला केले आश्वस्त

84
Shivsena Dasara Melava: शिवरायांची शपथ घेऊन सांगतो की... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला केले आश्वस्त
Shivsena Dasara Melava: शिवरायांची शपथ घेऊन सांगतो की... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला केले आश्वस्त

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी अखेरपर्यंत लढणार. इतर कोणावरही अन्याय न करता आरक्षण देणार. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण हे सरकार देणार म्हणजे देणार. शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत मराठा समाजासाठी लढणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात  (Shivsena Dasara Melava) दिले. आझाद मैदानावरील दसरा मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी मराठा समाजाला उद्देशून ते म्हणाले की, शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, त्यांच्या समोर जाऊन नतमस्तक होतो, मी आपल्याला विनंती करतो की टोकाचं पाऊल उचलू नका. आत्महत्या करू नका, आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडू नका. आपल्या मागे असलेल्या मुलाबाळांचा विचार करा, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आश्वस्त केले.

(हेही वाचा – BJP On UBT Shivsena Dasara Melava : शिवतीर्थावर अर्धवट भरलेल्या मैदानात अर्धवटरावांची सभा; भाजपाची टीका )

सर्वसामान्य मराठा कुटुंबातील आहे. मला त्यांचे दुःख वेदना कळतात. मलाही त्यांची जाणीव आहे. जस्टिस शिंदे यांची समिती आठवड्याचे चोविस तास काम करतेय. पुनर्विचार याचिका दाखल करून घेतली आहे. एक विंडो ओपन झाली आहे. कोणावरही अन्याय न करता कोणाचंही काढून न घेता, मराठा समाजाला टिकणारं आरक्षण हे सरकार देणार म्हणजे देणार. या एकनाथ शिंदेच्या शरीरामध्ये रक्ताचा थेंब असेपर्यंत मराठा समाजासाठी लढणार. गोरगरीब जनतेपेक्षा हे मुख्यमंत्री पदमहत्त्वाचं नाही. म्हणून राज्यातील प्रत्येक समाज घटकाला आपल्याला पुढे न्यायचं आहे. त्यांना न्याय द्यायचा आहे. यासाठी आपल्याला डबल इंजिनचं सरकार आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.