मध्य आणि हार्बर रेल्वे वर अनंत चतुर्दशी दिवशी मध्यरात्री १० विशेष लोकल सेवा सुरु राहणार आहे.२८ सप्टेंबर च्या मध्यरात्री ते २९ सप्टेंबरच्या पहाटेच्या दरम्यान गणेशभक्तांसाठी खास रेल्वेच्या फेर्या चालवल्या जाणार आहे. रात्री उशिरा विसर्जन करून घरी परतणार्यांसाठी त्याचा फायदा होणार आहे (Central Railway)
असे असले लोकलचे वेळापत्रक
मध्य रेल्वेवरून सीएसएमटी – कल्याण विशेष लोकल सीएसएमटीहून रात्री १.४० वाजता सुटून कल्याणला रात्री ३.१० वाजता पोहोचेल. सीएसएमटी – ठाणे विशेष लोकल सीएसएमटीहून रात्री २.३० वाजता सुटेल आणि रात्री ३.३० वाजता ठाण्याला पोहोचेल. सीएसएमटी – कल्याण विशेष लोकल सीएसएमटीहून रात्री ३.२५ वाजता सुटेल आणि पहाटे ४.५५ वाजता कल्याणला पोहोचेल. कल्याण – सीएसएमटी विशेष लोकल कल्याणहून रात्री १२.०५ वाजता सुटेल आणि रात्री १.३० वाजता सीएसएमटीला पोहोचेल. ठाणे – सीएसएमटी विशेष लोकल ठाणे येथून रात्री १ वाजता सुटेल आणि सीएसएमटीला रात्री २ वाजता पोहोचेल. ठाणे – सीएसएमटी विशेष लोकल ठाणे येथून २ वाजता सुटेल आणि सीएसएमटीला रात्री ३ वाजता पोहोचेल. (Central Railway)
(हेही वाचा : Onion Trader Protest : कांदा व्यापाऱ्यांचा बंद कायम; शेतकरी, व्यापाऱ्यांचा कोटींचा व्यवसाय विस्कळीत)
सीएसएमटी – बेलापूर विशेष लोकल सीएसएमटीहून रात्री १.३० वाजता सुटेल आणि बेलापूरला रात्री २.३५ वाजता पोहोचेल. सीएसएमटी – बेलापूर विशेष लोकल सीएसएमटीहून रात्री २.४५ वाजता सुटेल आणि बेलापूरला रात्री ३.५० वाजता पोहोचेल. बेलापूर – सीएसएमटी विशेष लोकल बेलापूरहून रात्री १.१५ वाजता सुटेल आणि सीएसएमटीला रात्री २.२० वाजता पोहोचेल. बेलापूर – सीएसएमटी विशेष लोकल बेलापूरहून रात्री २ वाजता सुटेल आणि सीएसएमटीला रात्री ३.०५ वाजता पोहोचेल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community