Rohit Sharma : रोहित शर्माच्या नावे वानखेडे स्टेडिअमवर स्टँड; अजित वाडेकर, शरद पवार यांचंही स्टँडला नाव

एमसीएच्या कार्यकारिणीत हा निर्णय झाला आहे.

128
Rohit Sharma : रोहित शर्माच्या नावे वानखेडे स्टेडिअमवर स्टँड; अजित वाडेकर, शरद पवार यांचंही स्टँडला नाव
Rohit Sharma : रोहित शर्माच्या नावे वानखेडे स्टेडिअमवर स्टँड; अजित वाडेकर, शरद पवार यांचंही स्टँडला नाव
  • ऋजुता लुकतुके

मुंबईतील वानखेडे स्टेडिअमच्या एका स्टँडला आता रोहित शर्माचं (Rohit Sharma) नाव देण्यात येणार आहे. त्यामुळे विराट कोहलीनंतर सक्रिय क्रिकेटपटूचं नाव एखाद्या स्टँडला देण्याची ही दुसरीच घटना असेल. २०१९ मध्ये दिल्ली क्रिकेट असोसिएशनने कोटला स्टेडिअमवरील एका स्टँडला विराट कोहलीचं (Virat Kohli) नाव दिलं होतं. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वाखाली भारताने अलीकडेच टी-२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स करंडक जिंकला होता. तर कसोटी अजिंक्यपद आणि एकदिवसीय विश्वचषकाची अंतिम फेरीही भारताने गाठली. त्यानिमित्त रोहितचा गौरव करण्यात येणार आहे. रोहित बरोबरच दिवंगत मुंबईकर क्रिकेटपटू अजित वाडेकर (Ajit Wadekar) आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची नावंही स्टँडला देण्यात येतील.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ग्रँड स्टँड लेवल ३ स्टँडला शरद पवार (Sharad Pawar) यांचं नाव दिलं जाईल. तर, ग्रँड स्टँड लेवल ४ ला अजित वाडेकर (Ajit Wadekar) यांचं नाव दिलं जाईल. दिवेचा पॅवेलियन लेवल ३ रोहित शर्माचं (Rohit Sharma) नाव दिलं जाणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी मांडले तर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी त्याला अनुमोदन दिलं.

(हेही वाचा – WhatsApp Status ची लिमिट वाढली ; आता ६० सेकंदांऐवजी …)

याबैठकीत एमसीएचे दिवंगत अध्यक्ष अमोल काळे यांना आदरांजली वाहण्यात आली. आता एमसीएस पॅव्हेलियनमधील मॅचडे ऑफिसचं नाव बदलून एमएसीए ऑफिस लाउंज करण्यात आलं आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनची ८६ वी बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत मुंबईतील क्रिकेटच्या विकासाबाबत चर्चा करण्यात आली. मुंबई क्रिकेट क्लबशी संलग्न असलेल्या क्लबला दिला जाणारा निधी ७५ कोटी करण्यात आला. पुढच्या काळात तो १०० कोटी करण्यात येणार आहे.

वानखेडे स्टेडिअमवर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांच्या नावे यापूर्वीच स्टँड आहेत. दिल्लीत अरुण जेटली स्टेडियमवर विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावे स्टँड आहे. कोलकाता येथे ईडन गार्डन्सवर सौरव गांगुलीच्या नावे स्टँड आहे.तर, बंगळुरुत राहुल द्रविडच्या नावे स्टँड आहे. आता रोहित शर्मा (Rohit Sharma) या आजी क्रिकेटपटूचं नाव या यादीत समाविष्ट होणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.