सध्या बारामती लोकसभेची निवडणूक (Baramati Lok Sabha) फारच चर्चेत आहे. कालपर्यंत या ठिकाणी नंणद आणि भावजय म्हणजे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात ही लढत होणार असे चित्र होते, परंतु आता यात पवार कुटुंबातील तिसऱ्या महिलेने उडी घेतली आहे. आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी उमेदवारीचा अर्ज घेतला आहे. त्यामुळे आता चर्चेला उधाण आले आहे.
कोण आहेत सुनंदा पवार?
सुनंदा पवार या राजेंद्र पवार यांच्या पत्नी आहेत. अजित पवार यांनीही बारामतीत डमी अर्ज घेतला होता. त्यानंतर सुनंदा पवार यांच्यासाठी शरद पवार गटाने अर्ज घेतला आहे. सुप्रिया सुळेंचा अर्ज बाद झाला तर खबरदारी म्हणून सुनंदा पवार यांचा अर्ज भरला जाणार आहे. बारामतीत दोन्ही गटाकडून डमी अर्ज घेतल्याने याठिकाणी मतदारसंघात नवा ट्विस्ट येणार की काय अशीही चर्चा स्थानिकांमध्ये आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha) पहिल्यांदाच पवार कुटुंबियांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. याठिकाणी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात लढत होणार आहे. परंतु खबरदारी म्हणून अजित पवारांकडून डमी अर्ज आणि शरद पवार गटाकडून सुनंदा पवार यांचा पूरक उमेदवारी अर्ज घेण्यात आला आहे. बारामतीत यंदा पवारविरुद्ध पवार अशी लढत आहे. त्यात अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवारांसह इतर नातेवाईक अजित पवारांविरोधात एकटवल्याचे चित्र उभे राहिले आहे.
Join Our WhatsApp Community