अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला आहे. सुप्रीम कोर्टाने आज (19 ऑगस्ट) हा निकाल दिला. मुंबई पोलिसांनी सीबीआयला संपूर्ण सहकार्य करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. तसंच गोळा केलेले सर्व पुरावे सीबीआयला सोपवण्याचे निर्देशही मुंबई पोलिसांना दिले आहेत. महाराष्ट्राला सरकारलाही निकालाचं पालन करावं लागेल, असंही कोर्टाने स्पष्ट सांगितलं. मात्र या निकाला नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांनी ट्विट केले असून, त्यांनी सत्यमेव जयते’ एवढंच पण सूचक ट्वीट केले आहे. पार्थ पवार यांच्या ट्विटनंतर आता पुन्हा एकदा ठाकरे सरकारमधील अस्थिरतेबद्दल चर्चा सुरु झाली आहे.
सत्यमेव जयते!
— Parth Pawar (@parthajitpawar) August 19, 2020
दरम्यान, पार्थ पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यावर शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्या बोलण्याला कवडचीही किंमत देत नाही, अशा शब्दात फटकारले होतं. तसेच पार्थ यांची भूमिका नसून त्यांची वैयक्तिक मागणी असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही ज्येष्ठ नेतेमंडळींनी पार्थ यांच्याबाबत काही टिपण्णीदेखील केली होती.
Join Our WhatsApp Community