-
ऋजुता लुकतुके
सर्व कंपन्यांची आता इलेक्ट्रिक गाड्या बाजारपेठेत उतरवण्यासाठी चुरस सुरू आहे. भारतात टाटा मोटर्सने (Tata Motors) यात आघाडी घेतली आहे. कंपनीने इलेक्ट्रिक वाहनांचं वितरण आणि विक्रीसाठी स्वतंत्र नवीन शोरुम सुरू केल्या आहेत. आता कंपनी आपल्या जुन्या गाड्यांनाही ईव्ही प्रकारात लाँच करत आहे. टाटा सिएरा ही कंपनीची एकेकाळची लोकप्रिय एसयुव्ही होती. आता कंपनी हीच गाडी आधुनिक रुपात बाजारात आणणार आहे. या गाडीची आयसीई आणि ईव्ही अशी दोन व्हर्जन यावर्षी भारतीय बाजारापेठेंत दाखल होतील.
या गाडीची भारतीय रस्त्यांवर चाचणी सुरू झालीय. आणि त्यातून या गाडीचा लुक एव्हाना लोकांना समजला आहे. भारत मोबिलिटी एक्स्पोमध्ये यापूर्वी या विराट गाडीचं दर्शन लोकांना झालेलं आहे. सुरुवीताला टाटा सिएराचं आयसीई (Tata Sierra ICE) व्हर्जन लोकांसमोर येईल. आणि त्यानंतर ही गाडी ईव्ही स्वरुपातही उपलब्ध होईल.
(हेही वाचा – Fire News : लंडनमधील वीज केंद्राला आग ; सर्वात मोठे विमानतळ बंद , 1300 उड्डाणे रद्द)
जुन्या सिएरा प्रमाणेच नवीन गाडीचा युएसपी (USP) असेल जुन्या पण, भारदस्त डिझाईनमध्ये सध्या रस्त्यांवर दिसत असलेली गाडी ही बऱ्यापैकी स्टिकरनी झाकलेली आहे. पण, तिचा विराट आकार आणि भारदस्तपणा लपत नाही. सिएरा ही राजेशाही गाडी असेल असं टाटांनी पूर्वीही पाहिलं होतं. आता फक्त तिचा अवतार आधुनिक असेल.
पहिल्या नजरेत डोळ्यांसमोर येतं ते गाडीचं देखणं काळं ग्रिल आणि त्यावर असलेली एलईडी (LED) दिव्यांची माळ. तर मागच्या बाजूलाही दोन टेल लाईट्सबरोबर अशीच एलईडी (LED) दिव्यांची माळ असेल.
2023 #TATA Sierra.ev Concepthttps://t.co/d1bUgjaHkC pic.twitter.com/d172h7slAl
— NetCarShow.com (@NetCarShow) February 14, 2023
(हेही वाचा – Rupee Vs Dollar : भारतीय रुपयाची गेल्या २ वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी; आठवडाभरात १.२ टक्क्यांची वाढ)
आधीची सिएरा तीन दरवाजांची होती. आता प्रवाशांना बसणं आणि उतरणं सुटसुटीत जावं यासाठी पाच दरवाजे ठेवण्यात आले आहेत. टाटा कंपनीने या गाडीच्या डिझाईनसाठी पेटंट मिळवलं आहे. त्यामुळे ही गाडी वेगळी आणि डिझाईनमध्ये भन्नाट असेल असं बोललं जातंय. तर त्यातील वैशिष्ट्य अजून लोकांसमोर आली नसली तरी त्यात खालील गोष्टींचा समावेश असू शकतो,
- १०.२५ इंचांचा चालकासमोरील डिस्प्ले तर १२.३ इंचांचा इन्फोटेन्मेंट डिस्प्ले
- पॅरोरमिक सनरुफ
- पॉवर्ड टेल-लाईट
- प्रिमिअम पद्धतीची साऊंड सिस्टिम
- व्हेंटिलेटेड सिट्स
चालक आणि सहप्रवाशांच्या सुरक्षेसाठी एबीएस (ABS) यंत्रणाही बसवण्यात येणार आहे. यात चालकाने मार्गिका बदलल्यास सूचना देणे तसंच दोन गाड्यांमधील अंतर ठरावीक फुटांपेक्षा कमी झाल्यास स्वयंप्रेरणेनं ब्रेक लागणे अशी वैशिष्ट्यही असतील. ईव्ही गाडीच्या बॅटरीची फारशी माहिती अजून कळलेली नाही. पण, एका चार्जमध्ये ५०० किमी चालेल इतकी तगडी बॅटरी या गाडीत असू शकेल.
टाटा मोटर्सनी आता इलेक्ट्रिक एसयुव्हींवर लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यामुळे सिएराच्या आयसीई (Tata Sierra ICE) व्हर्जन नंतर २०२५ च्या उत्तरार्धात कंपनी सिएरा ईव्हीही बाजारात आणणार आहे. गाडीची किंमत २५ लाख रुपयांच्या घरात असेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community