Tourist Places In Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशमध्ये पाहण्यासारखी ५ प्रमुख ठिकाणे!

171
Tourist Places In Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशमध्ये पाहण्यासारखी ५ प्रमुख ठिकाणे!

हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) हे भारताच्या उत्तरेकडील एक राज्य आहे. शिमला ही या राज्याची राजधानी आहे. जम्मू आणि काश्मीर, लडाख, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंड ही सीमेवर असलेली राज्ये आहेत. हिमाचल प्रदेश हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. मनाली, कुल्लू, धर्मशाला आणि शिमला इथे लोक मोठ्या संख्येने भेट देतात. हिल स्टेशन्स, प्राचीन मंदिरे आणि अनेक सुप्रसिद्ध ठिकाणांसाठी हे राज्य प्रचलित आहे. हिंदी आणि संस्कृत या दोन अधिकृत भाषा आहेत. (Tourist Places In Himachal Pradesh)

चला तर आज आपण जाणून घेऊया हिमाचल प्रदेशमध्ये कोणकोणत्या प्रमुख ५ ठिकाणांना तुम्ही भेट दिलीच पाहिजे. जाणून घेऊया या ठिकाणांची वैशिष्ट्ये. (Tourist Places In Himachal Pradesh)

१. मनाली :

हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) कुल्लू खोऱ्याच्या उत्तरेला वसलेले मनाली हे हिमालयातील २,०५० मीटर (६,७३० फूट) उंचीवर असलेले एक आकर्षक हिल स्टेशन आहे. मनालीमध्ये उपोष्णकटिबंधीय उच्च प्रदेशाचे हवामान आहे. इथे हिमवर्षाव प्रामुख्याने डिसेंबर ते मार्च दरम्यान होतो. इथे लोक मोठ्या संख्येने सुट्टीचा आनंद लुटायला येतात. हिवाळ्यात तर तुम्हाला इथे सगळीकडे बर्फ पाहायला मिळेल. त्यामुळे हिवाळ्यात इथे फिरायला वेगळीच मजा येते. उन्हाळ्यात देखील इथला आनंद कमी ह्त नाही. हडिंबा देवी मंदिर यासारखी अनेक आकर्षक ठिकाणे तुम्ही इथे पाहू शकता. तसेच निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊ शकता. (Tourist Places In Himachal Pradesh)

२. कुल्लू  :

देवांची दरी म्हणून कुल्लूची ओळख आहे. कुल्लू हे हिमालयाच्या कुशीत वसलेले एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. इथून बियास नदी वाहते. कुल्लू खोऱ्यातील बियास नदीच्या काठावर, भुंतर विमानतळाच्या उत्तरेस अंदाजे १० किलोमीटर अंतरावर आहे. पारबती खोर्‍यातील अप्रतिम सौंदर्य ग्रेट हिमालियन नॅशनल पार्क, अद्भुत मंदिरे, टेकड्या अशा वैविध्यपूर्ण वशिष्ट्यांनी नटलेले हे ठिकाण आहे. तुम्हाला ट्रेकिंग करायची हौस असल्यास हा आनंद तुम्ही इथे मनसोक्त लुटू शकता. या ठिकाणाला ऐतिहासिक पार्श्वभूमी देखील आहे. महाप्रलयाच्या वेळी मनू इथे आला. तो मनालीमध्ये स्थायिक झाला, ध्यान धारणा केली आणि यास ’कुलांत पीठ’ असे नाव दिले. कालांतराने या ठिकाणाला कुल्लू म्हटले जाऊ लागले. (Tourist Places In Himachal Pradesh)

(हेही वाचा – Tourist Places In Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशमध्ये पाहण्या सारखी ५ प्रमुख ठिकाणे!)

३. धर्मशाला : 

धर्मशाला, ज्यास धर्मशाळा असेही म्हणतात. हे भारताच्या हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) राज्यातील एक नयनरम्य शहर आहे. या स्थळाला प्राचीन व ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. धर्मशाळेचे संदर्भ ऋग्वेद आणि महाभारत यांसारख्या प्राचीन हिंदू धर्मग्रंथांमध्ये आढळतात. पूर्वी हा प्रदेश मुघलांच्या प्रभावाखाली होता. १७८५ मध्ये शीख साम्राज्याच्या ताब्यात आला. त्यानंतर, १८४६ मध्ये पहिल्या अँग्लो-शीख युद्धादरम्यान ब्रिटीशांनी हा प्रदेश काबीज केला. स्वातंत्र्यानंतर, ते एक लहान हिल स्टेशन झाले. १९६० मध्ये, १४ व्या दलाई लामा यांनी तिबेटमधून पळून केंद्रीय तिबेट प्रशासन येथे हलवले. प्रदेशाची अर्थव्यवस्था कृषी आणि पर्यटनावर अवलंबून आहे. धर्मशाळा आता एक प्रमुख हिल स्टेशन झाले आहे. इथले निसर्गरम्य सौंदर्य आणि आध्यात्मिक वातावरण पर्यटकांना भुरळ पाडतात. (Tourist Places In Himachal Pradesh)

४. शिमला : 

शिमला, ज्यास १९७२ पर्यंत सिमला म्हणूनही ओळखले जायाचे. ही हिमाचल प्रदेशची राजधानी आहे आणि हे सर्वात मोठे शहर देखील आहे. या शहराला समृद्ध ऐतिहासिक वारसा प्राप्त झाला आहे. तसेच वास्तुकला, नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक वारसा यांसाठी देखील हे शहर ओळखले जाते. पूर्वी अनेक हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण इथे होत असत. श्यामला देवीवरून “शिमला” हे नाव पडले आहे. शिमल्यात विशिष्ट प्रकारची वास्तुकला पाहायला मिळते. ट्यूडरबेथन शैलीतील इमारती इथे पाहायला मिळतात. राष्ट्रपती निवास (व्हाइसरेगल लॉज) आणि क्राइस्ट चर्च ही याची प्रमुख उदाहरणे आहेत. हे ठिकाण हिमालयातील घनदाट जंगलांनी वेढलेले आहे. त्यामुळे इथला चित्तथरारकपणाही विशेष आकर्षणाचे केंद्र आहे. विशेष म्हणजे कालका-शिमला रेल्वे हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे. इथला प्रवासही निसर्गरम्य असतो. (Tourist Places In Himachal Pradesh)

५. डलहौसी : 

डलहौसी हे हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) एक लोकप्रिय हिल स्टेशन असून पाच टेकड्यांवर पसरलेले आहे. तसेच धौलाधर पर्वतरांगांच्या बर्फाच्छादित शिखरांचे अद्भुत दृश्य तुम्ही येथे पाहू शकता. हे ठिकाण घनदाट जंगले आणि नयनरम्य धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे. म्हणूनच हनीमूनला येणार्‍यांची संख्या लक्षणीय आहे. तसेच कौटुंबिक आणि मित्रांसोबतच्या पिकनिकसाठी देखील हे उत्तम ठिकाण आहे. तुम्हाला शांत, निसर्गरम्य वातावरणात रमायला आवडत असेल तर हे तुमच्यासाठी आदर्श ठिकाण आहे. (Tourist Places In Himachal Pradesh)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.