केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी शनिवारी, २४ फेब्रुवारीला घाटकोपर ते कल्याण आणि पुन्हा कल्याण ते घाटकोपर, असा मुंबई उपनगरीय लोकलने परतीचा प्रवास केला. दुपारी 12:42 वाजता घाटकोपर ते कल्याणपर्यंत बदलापूर एसी फास्ट लोकलने त्यांनी प्रवास केला. त्यानंतर, परतीच्या प्रवासासाठी त्यांनी कल्याणहून संध्याकाळी 5:39 वाजता सुटणाऱ्या जलद नॉन-एसी लोकल ट्रेनची निवड केली. कल्याण स्थानकावर पोहोचल्यावर केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.
लोकल ट्रेनमध्ये त्यांनी लोकलमधील प्रवाशांशी संवाद साधला. या प्रवासाची छायाचित्रे आणि व्हिडियो निर्मला सीतारामन यांच्या अधिकृत “X”अकाउंटवर शेअर केले आहेत. या छायाचित्र आणि व्हिडियोमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांनी वेढलेले दृष्य दिसत आहे. यावेळी सहप्रवाशांशी त्यांनी हसून संवाद साधला. यावेळी त्यांच्यातील विनम्रतेचे दर्शन झाले, सामान्य लोकांशी मैत्रीची भावना त्यांच्यामध्ये जाणवल्याची प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त केली आहे. यावेळी सीतारामन यांनी स्थानकाचे कर्मचारी आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांशीही संवाद साधला.
(हेही वाचा – Shiv Sena Shinde Group: जागावाटपाबाबत शिंदे गटाने व्यक्त केले ठाम मत, वाचा सविस्तर )
प्रवासी सीतारामन यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी उत्सुक
या दरम्यान, अनेक प्रवासी सीतारामन यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी उत्सुक असल्याचेही दिसून येते. काही महिला, तरुण आणि मुलांशी प्रवासादरम्यान त्यांनी संवाद साधला. मंत्र्यांनी लोकलने प्रवास करण्याचा घेतलेला निर्णय हा केवळ सार्वजनिक वाहतूक आणि मुंबई लोकल प्रती असलेली विश्वासार्हता दर्शवते असेच नाही, तर प्रवाशांना दररोज ज्या आव्हानांना तोंड द्यावे लागते, याविषयी प्रत्यक्ष अनुभव त्यांनीही घेतला, असे मतही काही प्रवाशांनी यावेळी व्यक्त केले.
यापूर्वी मोदी सरकारच्या अनेक नेत्यांनी सार्वजनिक वाहतुकीद्वारे प्रवास करून प्रवाशांची भेट घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अनेकदा दिल्ली मेट्रोने प्रवास करताना दिसतात. त्यांनी गेल्या वर्षी मुंबई मेट्रोच्या काही नव्या सेवांचे उद्घाटन केले होते. त्यावेळी मुंबई मेट्रोने प्रवास केला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते.
हेही पहा –