शरद पवारांनी केलेल्या दाव्यावर Praful Patel काय म्हणाले? 

शरद पवार यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर प्रफुल्ल पटेल यांनी दिले स्पष्टीकरण, एक्सवर माहिती देत केले अनेक खुलासे.

200
शरद पवारांनी केलेल्या दाव्यावर Praful Patel काय म्हणाले? 

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी एका मुलाखतीमध्ये अनेक गौप्यस्फोट केले होते. त्यातील एक म्हणजे प्रफुल्ल पटेल यांची २००४ पासून भाजपासोबत युती करण्याची इच्छा होती, असे म्हटले होते. यावर आता स्वतः प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी स्पष्टीकरण दिले असून शरद पवारांनी केलेला गौप्यस्फोट खरा असल्याचे मान्य केले आहे. तसेच पटेल यांनी एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट करत त्यांनी खुलासा केला आहे. (Praful Patel)

(हेही वाचा – Helicopter Crash: इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्टर कोसळले)

ट्वीटरवर काय म्हणाले प्रफुल्ल पटेल ? 

ट्वीटरवर प्रफुल्ल पटेल म्हणतात की होय, मी २००४ सालापासून भाजपाशी युती व्हावी असा आग्रह पवार साहेबांकडे धरला होता. तरी पण त्यांचा मान, सन्मान व त्यांच्याविषयीचा आदर असल्याने मी त्यांच्यासोबत राहिलो. त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाची संधी दिल्याबद्दल मी सदैव त्यांचा आभारी राहीन. संधी मिळाल्यावर देशासाठी व जनतेसाठी चांगले काम करून पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सन्मान वाढविण्याच्या दृष्टीने मी सतत प्रयत्न केले. हे देखील खरे आहे की, १९९९ मध्ये काँग्रेसमध्ये (Congress) सतत अपमान होत असल्यामुळे काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना पवार साहेबांना करावी लागली. तेव्हा आम्ही त्यांच्यासोबत राहिलो आणि हे ही तितकेच खरे आहे की, २००४ मध्ये काँग्रेसने आमच्या पक्षाचे जास्त आमदार निवडून आल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद नाकारले. साहेब, तुमच्याबद्दलचा आदर कायम आहे! असे ट्वीटरवर प्रफुल्ल पटेल म्हणाले. 

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: पाचव्या टप्प्यातील मतदानापूर्वी मुंबईत ५,८३६ वाहनांची झाडाझडती )

२००४ बाबत शरद पवारांचे स्पष्टीकरण 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (Nationalist Congress Party) २००४ मध्ये जास्त जागा येऊनही मुख्यमंत्रिपदासाठी आग्रह का धरला नाही? याबाबत शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने २००४ मध्ये मुख्यमंत्रि‍पदाबाबत निर्णय फार विचारपूर्वक घेतला होता. तेव्हा अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपविण्याचा प्रश्न नव्हता. कारण ते फारच नवखे होते. तेव्हा छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याकडे मुख्यमंत्रीपद दिले असते तर भविष्यात पक्षात फूट पडली असती, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांनी दिलेल्या या कबुलीनंतर शरद पवारांकडून काय प्रतिक्रिया दिली जाते, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. (Praful Patel)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.