… तर मुस्लिमांचे हिंदुस्थानात स्थान काय असते?

139

स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर हिंदूंना २०१४ साली खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले याची जाणीव झाली, अशा काही प्रतिष्ठित लोकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यावेळी तथाकथित निधर्मियांनी आकंडतांडव केले होते. पण हिंदूंच्या मनात ही भावना का उत्पन्न झाली, हे महत्वाचे आहे. कालपर्यंत काँग्रेसच्या राजवटीत हिंदूंना कायम सापत्न वागणूक मिळत होती. त्यांनी न्याय हक्कासाठी लढणे व्यवस्थेला अमान्य होते, हिंदूंनी देशासाठी कायम त्याग करत राहणे आणि अल्पसंख्याक विशेषत: मुसलमान आणि ख्रिस्ती समाजाने भयमुक्त जीवन जगावे, त्यांना भरपूर सवलती दिल्या जातील, त्यांना संरक्षण मिळेल, अशी रचना बनवण्यात आली. २०१४ साली प्रथमच हिंदू एकगठ्ठा मतांच्या जोरावर नरेंद्र मोदी यांचे सरकर आले आणि स्वातंत्र्यपूर्व काळात वीर सावरकर यांनी जे विचार मांडले त्यावर काही अंशी अंमल होवू लागल्यावर हिंदूंना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाल्याची भावना निर्माण झाली आहे, जर देशाचे नेतृत्व वीर सावरकर यांच्याकडे असते तर ही भावना १९४७ सालीच निर्माण झाली असती आणि पाकिस्तानची निर्मिती देखील झाली नसती.

( हेही वाचा : आज वीर सावरकरांचे परराष्ट्र धोरण काय असते?)

१. देशाचे विभाजन करणारी योजना वीर सावरकरांनी धुडकावून लावली होती. पण काँग्रेसने तिकडे दुर्लक्ष केले. २ मे १९४२ रोजी काँग्रेस समितीच्या बैठकीत एखाद्या राज्याला भारतातून फुटून निघायचे असेल तर त्याला भारतात राहण्याची सक्ती केली जाणार नाही, हे मान्य करून पर्यायाने देशाचे आणखी तुकडे होण्याला काँग्रेसने मान्यता दिली. ब्रिटिशांनी देशाचा सगळा कारभार मुस्लिम लीगच्या हाती दिला तरी काँग्रेसचा पाठिंबा असेल, असे गांधींनी धोरण ठेवले होते. गांधींच्या या बोटचेपे धोरणाने स्वातंत्र्यादरम्यान देशाची फाळणी करण्याची जीनांची मागणी जोर धरू लागली आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाची फाळणी झाली. अखंड भारत हे वीर सावरकर यांचे स्वप्न भंगले. तरीही वीर सावरकर यांनी अखंड भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नरत रहा, असे सांगितले होते. देशाला स्वातंत्र्य मिळत असताना मोहनदास करमचंद गांधी आणि काँग्रेसने सर्व प्रक्रियेवर नियंत्रण मिळवले, जे स्वातंत्र्य हजारो क्रांतिकारकांच्या बलिदानाने मिळाले त्या क्रांतिकारकांचे मुकुटमणी वीर सावरकर तेव्हा हयात होते, मात्र केवळ सत्तेच्या लालसेपोटी आणि अहंकारापोटी सावरकर यांना सत्तेच्या प्रक्रियेपासून दूर ठेवले. त्यामुळे सावरकर इच्छा असूनही फाळणी टाळू शकले नाहीत, अन्यथा आज पाकिस्तान नावाचे दुखणे अस्तित्वात नसते, पर्यायाने काश्मीरमधील दहशतवाद, काश्मिरी पंडितांच्या वंशविछेद झाला नसता.

२. वीर सावरकर अंदमानातील कारागृहात काळ्यापाण्याची शिक्षा भोगत असताना तिथे मुसलमान कैद्यांकडून हिंदू कैद्यांचे जबरदस्तीने धर्मांतर केले जात होते. त्यांना मांस खाऊ घालून हिंदू बाटले, असे मुसलमान कैदी भासवत असत. ७० वर्षानंतर मोदी सरकारच्या राजवटीतील भाजपशासित राज्ये आता धर्मांतर विरोधी कायदे करत आहेत, त्यामागे वीर सावरकर यांचीच प्रेरणा आहे. सावरकर जर आज असते तर हा कायदा देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हाच झाला असता. काँग्रेसच्या राजवटीत अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण या धोरणामुळे स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर देशातील १० राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्याक बनले आहेत, तिथे खिश्र्चन, मुसलमान यांची संख्या हिंदूंपेक्षा वाढलेली आहे, हे संकट वीर सावरकरांच्या नेतृत्वात कदापी पहायला मिळाले नसते.

३. २३ डिसेंबर १९२३ रोजी बाटवलेल्या हजारो हिंदूंचे शुद्धी करणाऱ्या स्वामी श्रद्धानंद यांचा अब्दुल रशिदने खून केला. त्यानंतर १० जानेवारी १९२७ पासून सावरकर बंधूंनी श्रद्धानंद नावाचे साप्ताहिक सुरू केले. या साप्ताहिकातून सावरकर धर्मांतर आणि हिंदू संघटन या विषयावर लिहीत राहिले.
पान ४ वरून आजमितीस काँग्रेसच्या मुस्लिम तुष्टीकरणाच्या धोरणामुळे हिंदुस्थानात हिंदू बहुसंख्येने असूनही त्यांना दुय्यम दर्जा दिला जात आहे. मुसलमानांच्या एक गठ्ठा मतांच्या राजकारणामुळे देशात काही राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्याक बनले आहेत. लव जिहादच्या माध्यमातून हिंदू मुलींना बाटवले जात आहे आणि हिंदूंचा वंश संपवण्याचे कारस्थान रचले जात आहे. एकट्या केरळ राज्यामधून ३२ हजार हिंदू मुलींचे अपहरण करण्यात आले. त्यांना बाटवले गेले असावे, असा कयास बांधला जात आहे. अशा प्रकारे हिंदूंचे होणारे धर्मांतर रोखण्यासाठी वीर सावरकर यांनी देशाची उभारणी करतानाच देशात मुसलमानांचे तुष्टीकरण न होता समान नागरी कायद्यासारखी तरतूद केली असती.

४. १९३१ आणि १९४१ च्या जनगणनेवर काँगेसने बहिष्कार टाकला होता, पण या नोंदणीचे महत्व जाणणाऱ्या सावरकरांनी सर्व हिंदूंनी यात सहभाग घ्यावा म्हणून प्रचार केला. पण तरीही पंजाब आणि बंगालमधील हिंदूंनी यात सहभाग घेतला नाही. त्यामुळे फाळणीच्या वेळी हिंदू त्यांच्या हक्कांपासून वंचित राहिले.काँग्रेसने कायम हिंदूंना त्याग करण्यास सांगितले, त्यामुळे आपले न्याय हक्क मागणे या विचारापासून हिंदू कायम दूर राहिले, आजपावोत हिंदूंना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवण्यात आले, याउलट मुसलमानांना विविध सवलती वाटण्यात आल्या, सावरकर यांच्या विचारांमुळे हिंदूंमध्ये न्याय हक्क मागण्याची जाणीव झाली असती, हिंदूंना सापत्न वागणूक मिळाली नसती, आपले हक्क मिळवण्यासाठी संघटित शक्ती किती महत्वाची आहे, याची जाणीव हिंदूंमध्ये निर्माण झाली असती.

५. परकीय आक्रमकांनी आपल्यावर शेकडो वर्षे राज्य केले. याचे मुख्य कारण हिंदू एकजूट होवून लढलेच नाही. हे सावरकर यांनी जाणले होते. म्हणून देशातील हिंदूंना एका धाग्यात गोवण्यासाठी सावरकरांनी संपूर्ण देशात झंझावती दौरे केले. त्यावेळी काँग्रेस मात्र हिंदू-मुस्लिम ऐक्याशिवाय स्वराज्य नाही ही गांधींची भूमिका होती. त्यासाठी त्यांना अवाजवी सवलती देत होती. ब्रिटिशांनी मुस्लिम लीगला सत्ता दिली तरी चालेल असा विचार गांधी करत होते. त्यामुळे सावरकर यांनी हिंदू राष्ट्रवादाचा पुरस्कार केला. जात, पंथ, वंश, धर्म याचा विचार न करता एक माणूस एक मत असे हिंदी राज्य सावरकर यांना अपेक्षित होते.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही काँग्रेसने हेच मुस्लिम तुष्टीकरण करण्याचे धोरण स्वीकारले आणि देशात हिंदू ऐक्य होणार नाही याची काळजी घेतली. त्यासाठी हिंदूंना जातीपातीत विभागून ठेवले. सावरकर यांनी यावरच घाला घातला होता, हिंदूंना जातीपातीमधून बाहेरून काढून हिंदू म्हणून संघटीत केले. सिंध प्रांतापासून हिंद सागरापर्यंत जे या भारतभूमीला पवित्र मानतात ते हिंदू अशी व्याख्या वीर सावरकर यांनी केली. ही व्याख्याच हिंदूंना जातीपातीमधून बाहेर काढून त्यांना हिंदू म्हणून संघटीत करते. यामुळेच हिंदूचे जे अस्तित्व धोक्यात आले आहे, ते सुरक्षित राहणार आहे. मोदी सरकारने यामुळे देशात समान नागरी कायद्याची गरज आहे, असे विषद केले. हा कायदा मुळातच वीर सावरकर यांची ही व्याख्या अस्तित्वात आणत आहे.

६. वीर सावरकर यांनी हिंदूंना ब्रिटीशांच्या सैन्यात जाऊन सैनिकी प्रशिक्षण घेण्याचा आग्रह धरला होता. त्यामुळे १९४४ मध्ये आझाद हिंद सेनेलाही ४० हजार प्रशिक्षित हिंदू सैनिकांचे बळ प्राप्त झाले होते. देशाची फाळणी झाली ती धर्माच्या आधारावर. त्यामुळे पाकिस्तानच्या निर्मितीनंतर सैन्याचीही विभागणी झाली. जर त्यावेळी सैन्यात मुस्लिमांची संख्या जास्त असती तर पाकिस्तानने दुस-याच दिवशी भारतावर आक्रमण करून संपूर्ण भारतावर ताबा मिळवला असता. शस्त्रबळावाचून धर्मविजय पंगू असतो; धर्मबळावाचून नुसता शस्त्रविजय पाशवी असतो, हे वीर सावरकर यांचे तत्व होते, म्हणूनच सावरकर यांनी कायम सैनिकीकरणावर भर दिला. वीर सावरकर आज असते, तर बांगलादेशी घुसखोरी, रोहिंग्या मुसलमानांची दहशत, काश्मीरात फुटीरतावादी, पंजाबमधील दहशतवाद यांचे अस्तित्व निर्माण झाले नसते.

७. १९४१ मध्येच आसामात मुस्लिम घुसखोरी सुरू झाली होती. त्याबाबत सावरकरांनी शासनाला सावध केले होते. पण निसर्गाला पोकळी सहन होत नाही, असे म्हणत नेहरूंनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्या भूमीवर गवताचीही काडी उगवत नाही, असे नेहरूंचे म्हणणे होते. वीर सावरकर यांच्या या इशा-याकडे काँग्रेसने दुर्लक्ष केल्यामुळे आज आसामसह पूर्वांचलातील १० राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्याक बनले आहेत आणि देश दुस-या फाळणीच्या वाटेवर आहे का, अशी भीती निर्माण झाली. म्हणूनच देशाचे नियंत्रण वीर सावरकर यांच्याकडे असते तर नक्कीच पूर्वांचलातील राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्याक बनले नसते, तसेच देशात जिथे जिथे मुस्लिम बहुल वस्त्या बनवण्याचे षडयंत्र बनवले जात आहेत, तेही झाले नसते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.