#VeerSavarkarजयंतीनिमित्त खासदारांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना वाहिली आदरांजली

186

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शनिवारी संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त  वीर सावरकरांच्या  प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.

अर्जुन राम मेघवाल, संसदीय कामकाज आणि सांस्कृतिक राज्यमंत्री, परराष्ट्र व्यवहार स्थायी समितीचे अध्यक्ष पी. पी. चौधरी, खासदार, माजी खासदार आणि इतर मान्यवरांनीही संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

उत्पल कुमार सिंग आणि पी. सी. मोदी, अनुक्रमे लोकसभा आणि राज्यसभेचे सरचिटणीस यांनीही यावेळी पुष्पहार अर्पण केला. यावेळी मध्यवर्ती सभागृहात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तकांचे प्रदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या मान्यवरांना लोकसभा सचिवालयातर्फे हिंदी आणि इंग्रजीत प्रकाशित स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनचरित्राची पुस्तिका प्रदान करण्यात आली.

भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी 26 फेब्रुवारी 2003 रोजी संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेचे अनावरण केले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.