स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४१व्या जयंतीनिमित्त अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) यांनी अंदमान नकोबारला भेट दिली. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या वीर सावरकर यांच्यावरील विशेष चरित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन आणि लेखन केले आहे तसेच त्यांनी वीर सावरकर यांची व्यक्तिरेखाही या चित्रपटात साकारली आहे.
#WATCH | Port Blair, Andaman and Nicobar Islands: Actor Randeep Hooda visited the Cellular Jail ahead of Indian freedom fighter and reformer Vinayak Damodar Savarkar’s 141st birth anniversary.
Randeep Hooda played the character of Savarkar in his biopic ‘Swatantrya Veer… pic.twitter.com/oJbPFmsmVT
— ANI (@ANI) May 27, 2024
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात कोलकत्त्यामध्ये पंतप्रधान मोदींचा रोड शो, तर विरोधकांनीही कसली कंबर! )
रणदीप हुड्डा (Randeep Hooda) वीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त पोर्ट ब्लेअर मध्ये हजर राहून त्यांनी वीर सावरकर यांना आदरांजली वाहिली. वीर सावरकर कोठडीला भेट देऊन त्यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. ट्विटरवरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “वीर सावरकरांच्या कथेचा अभ्यास करताना आणि ती पडद्यावर साकारताना माझा त्यात सहभाग खूप वाढला आहे. वीर सावरकरांच्या आयुष्याचे सार समजून घेतले. त्यातून मला प्रेरणा मिळाली. त्यानंतर मी कथा जास्त चांगल्या पद्धतीने चित्रीत करू शकलो. तेव्हा मला खूपच छान वाटले. आज आपण येथे सेल्युलर तुरुंगात आलो आहोत जिथे विनायकजी यांना ५० वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. सर्व सशक्त क्रांतिकारक लोकांना ब्रिटिशांनी देशापासून दूर विलगीकरणात ठेवले होते आणि ही ती जागा आहे…”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community