वीर सावरकरांनी आपले संपूर्ण जीवन राष्ट्रवादाच्या प्रसारासाठी समर्पित केले : योगी

142

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी वीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त ट्विट केले आणि सावरकरांचे विचार प्रत्येक पिढीला राष्ट्रपूजेची प्रेरणा देत राहतील, असे म्हटले. योगींनी लिहिले की, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे संपूर्ण जीवन भारत मातेच्या उपासनेसाठी आणि राष्ट्रवादाच्या प्रसारासाठी समर्पित होते. त्यांचे प्रखर राष्ट्रवादी विचार प्रत्येक पिढीला राष्ट्रपूजेची प्रेरणा देत राहतील.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली आदरांजली

 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते शनिवारी संध्याकाळी लखनौ येथील इंदिरा गांधी प्रतिष्ठानमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. प्रभात प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘वीर सावरकर’ हे पुस्तक केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांनी लिहिले आहे. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी शनिवारी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त लखनौ येथील निवासस्थानी वीर सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. याशिवाय उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक, भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह आणि अन्य नेत्यांनीही वीर सावरकरांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.

( हेही वाचा: सैन्य भरतीचे नियम बदलणार; आता 4 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्ती )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.