स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 141व्या जयंतीनिमित्त दिल्ली पब्लिक लायब्ररीने (Delhi Public Library) गुगल मीटच्या माध्यमातून चर्चासत्र आयोजित केले होते. ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Veer Savarkar) आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचे योगदान’ ही या चर्चासत्राची संकल्पना होती.
दिल्ली पब्लिक लायब्ररीतील साहाय्यक ग्रंथपाल आणि माहिती अधिकारी उर्मिला रौतेला यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या वेळी डॉ. अजित कुमार, वीर सावरकरांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित विक्रम सावरकर (Ranjit Savarkar), प्रा. रिझवान कादरी (Rizwan Qadri), सुभाषचंद्र कंखेडिया (Subhash Chandra Kankhedia), नरेंद्रसिंग धामी (Narendra Singh Dhami) आणि अनेक सावरकरप्रेमी सहभागी झाले होते.
(हेही वाचा – Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीच्या निमित्ताने ‘मी सावरकर’ संस्थेच्या वतीने 32 मुला-मुलींचे उपनयन)
दिल्ली पब्लिक लाइब्रेरी द्वारा दिनांक 28 मई 2024 को वीर सावरकर जयंती के अवसर पर गूगल मीट के माध्यम से “स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर और भारत के स्वतंत्रता आंदोलन में उनका योगदान” विषय पर संगोष्ठी का आयोजन किया गया I pic.twitter.com/Nk1hGUrdas
— Delhi Public Library (@delhipublibrary) May 28, 2024
सावरकर हा शब्द साहस आणि धैर्य प्रदान करतो – डॉ. अजित कुमार
दिल्ली पब्लिक लायब्ररीचे महासंचालक डॉ. अजित कुमार यांनी वीर सावरकरांचे स्मरण करून आपल्या भाषणाची सुरुवात केली. ते म्हणाले, “विनायक या नावाचा अर्थ आपल्या सर्वांना माहीत आहे. वीर सावरकर हे भारतमातेचे खरे पुत्र होते. वीर सावरकर हा शब्द साहस आणि धैर्य प्रदान करतो. वीर सावरकर लोकमान्य टिळकांनी प्रकाशित केलेले केसरी हे वृत्तपत्र वाचत असत. त्यांना देशभक्त बनवण्यात आणि देशासाठी काहीतरी करण्याची भावना निर्माण करण्यात अनेक पुस्तके आणि केसरी वृत्तपत्रांचे मोठे योगदान आहे.
लंडनमध्ये वीर सावरकरांनी आपल्या सहकारी भारतीय विद्यार्थ्यांना प्रेरित केले आणि स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी ‘फ्री इंडिया सोसायटी’ ही संस्था स्थापन केली. फ्री इंडिया सोसायटी ही इंग्लंडमधील भारतीय विद्यार्थ्यांची एक युवा संस्था होती, जी ब्रिटीश राजवटीपासून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी वचनबद्ध होती. सुरुवातीला तो एक बौद्धिक गट होता; परंतु त्याच्या संस्थापक नेत्या मादाम भीकाजी कामा यांच्या नेतृत्वाखाली ती एक क्रांतिकारी संस्था बनली. या संस्थेने क्रांतिकारी कल्पनांच्या प्रसारासाठी ‘फ्री इंडिया सोसायटी’ नावाचे पत्रही जारी केले.
रिझवान कादरी यांनी दिला अंदमानच्या आठवणींना उजाळा
मुख्य वक्ते प्रा. रिझवान कादरी आपल्या भाषणात म्हणाले की, वीर सावरकर हे एक असे भारतीय होते, ज्यांना एकाच आयुष्यात दोनदा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. काळ्या पाण्याच्या कठोर शिक्षेदरम्यान त्यांना अनेक कष्ट सोसावे लागले. त्यांना अंदमान आणि निकोबारच्या सेल्युलर तुरुंगात 6 महिने काळ कोठडीत ठेवण्यात आले होते. वीर सावरकरांनी एकाच अंधाऱ्या खोलीत कोळसा आणि नखे वापरून अनेक कविता लिहिल्या. त्यांनी 10 हजारांहून अधिक कविता लिहिल्या.
सावरकरांचा नातू असण्यापेक्षा त्यांचे अनुयायी असणे अधिक महत्त्वाचे – रणजित सावरकर
या कार्यक्रमाला संबोधित करताना वीर सावरकरांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित विक्रम सावरकर म्हणाले, “तुम्ही मला त्यांचा नातू म्हणून नव्हे, तर सावरकर अभ्यासक म्हणून संबोधले याबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छितो. स्वतः वीर सावरकर घराणेशाहीच्या राजकारणाच्या विरोधात होते. सावरकरांचा नातू असण्यापेक्षा त्यांचे अनुयायी असणे अधिक महत्त्वाचे आहे. वीर सावरकर हे इतिहासाचे विद्वान होते. त्यांना त्यांच्या वडिलांकडून प्रेरणा मिळाली. इतिहासातून प्रेरणा घेत ते म्हणाले की, परिस्थिती काहीही असो, त्याचे पालन करताना चूक झाली, तरी त्याची पुनरावृत्ती होऊ नये. चुकांमधून शिकायला हवे. पूर्वजांची चूक असली, तरी ती पुढे नेऊ नये. वीर सावरकरांनी वयाच्या 15व्या वर्षी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याची शपथ घेतली. चापेकर बंधूंच्या फाशीनंतर त्यांनी देशासाठी क्रांतीचे नेतृत्व करण्याची शपथ घेतली. त्या वेळी ‘मी देशासाठी माझे प्राण देईन’, अशी सर्वसाधारण भावना होती; परंतु सावरकरांना विश्वास होता की, मरण पावल्यास मी देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकणार नाही. जोपर्यंत आपण शत्रूला मारत नाही; तोपर्यंत देश स्वतंत्र होणार नाही. त्यांंनी शपथ घेतली की, ते त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत शत्रूचा वध करतील.
सावरकरांची डायरी देशाच्या प्रत्येक भाषेत प्रकाशित करावी – सुभाषचंद्र कानखेडिया
दिल्ली पब्लिक लायब्ररीचे अध्यक्ष सुभाषचंद्र कानखेडिया यांनी आपल्या भाषणात सांगितले की, वीर सावरकरांनी लिहिलेली डायरी अद्याप प्रकाशित झालेली नाही. आम्ही भारत सरकारला विनंती करू की, ती डायरी देशाच्या प्रत्येक भाषेत प्रकाशित करावी. वीर सावरकरांचे मोठे भाऊ गणेश दामोदर सावरकर यांचेही स्मरण करणे आणि त्यांना नमन करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. कारण जेव्हा वीर सावरकरांना अंदमानच्या सेल्युलर तुरुंगात ठेवण्यात आले होते, तेव्हा त्यांचा मोठा भाऊ आधीच तेथे कैद होता. देशासाठी लढल्याबद्दल सावरकर बंधूंना ही शिक्षा मिळाली. कानखेडिया पुढे म्हणाले की, सेल्युलर तुरूंगातील जेलर इतका क्रूर होता की, त्याने दोघा भावांना कित्येक महिने भेटू दिले नाही. एके दिवशी गणेश दामोदर सावरकरांनी वीर सावरकरांना पाहिले आणि म्हणाले, तात्या, तुम्ही इथे कसे आलात? आम्ही या दोन महान स्वातंत्र्यसैनिक बांधवांना सलाम करतो.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी नरेंद्रसिंग धामी यांनी या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले आणि वीर सावरकरांच्या स्मृतींना उजाळा दिल्याबद्दल रणजित सावरकर यांचे विशेष आभार मानले. (Veer Savarkar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community