स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या 141 व्या जयंतीचे निमित्ताने भगूर (Bhagur) येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मस्थळावर दिवसभर सावरकरप्रेमींचा ओघ सुरू होता. 28 मे रोजी सकाळी सात वाजल्यापासूनच सावरकर वाड्यामध्ये राज्यभरातील स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमींनी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. या वेळी येणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमींनी ‘राष्ट्रभक्ती तुझे नाव सावरकर’, ‘वंदे मातरम’, ‘भारत माता की जय’ अशी घोषणाबाजी करत येथील जन्मस्थळावर नतमस्तक होत अभिवादन केले.
(हेही वाचा – Veer Savarkar यांच्या जयंतीनिमित्त इस्त्रायलचे कॉन्सुल जनरल कोबी शोशानी यांच्याकडून अभिवादन)
मान्यवरांचे अभिवादन
सकाळी पुरातत्व विभागाच्या वतीने सचिन पगारे, शरद चौधरी, सोमनाथ बोराडे यांनी शासकीय पूजन केले. मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे (Manjiri Marathe) यांनी वाड्याला भेट देत अभिवादन केले. या प्रसंगी त्यांनी देशाला हिंदुत्वाची गरज असल्याचे सांगत हिंदूंनी एकत्र येण्याचे आवाहन केले.
‘अनादि मी अनंत मी’ गीतांचा कार्यक्रम सादर
सकाळी नाशिक येथील चारुदत्त दीक्षित यांचा बागेश्री निर्मित ‘अनादि मी अनंत मी’ हा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. या वेळी विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य एकनाथ शेटे, मृत्युंजय कापसे, विनोद शिंदे, राधाकृष्ण गामने, प्रतापराव पवार, अनिल पवार, प्रशांत कापसे, अशोक मोजाड, शिवाजी घुगे, विलास कुलकर्णी, पांडुरंग आंबेकर, ह.भ.प. गणेश महाराज करंजकर, ललित भदे आदींसह सर्वच पक्षाचे व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूह व एसएमबीटी आयुर्वेदिक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य तपासणी शिबिराचा 40 नागरिकांनी लाभ घेतला. वाड्याच्या प्रवेशद्वारावर सामाजिक कार्यकर्ते सुनील जोरे यांनी फलक हाती घेत दारणा तीरावर रखडलेल्या सावरकर उद्यानाची समस्या प्रखरपणे मांडली. भूषण कापसे यांनी या वाड्याविषयी येणाऱ्या सावरकर प्रेमींना माहिती दिली. या दिनी स्मारकाचे व्यवस्थापक मनोज कुवर, भूषण कापसे, प्रशांत लोया, खंडू रामगडे, योगेश बुरके, मंगेश मरकड, आकाश नेहरे, प्रसाद आडके, समाधान धात्रक, निलेश हासे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. (Veer Savarkar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community