आफ्रिकेतील नामिबियातून आठ चित्ते तब्बल ७० वर्षांनंतर भारतात दाखल झाले आहेत. नामिबियातून विशेष विमानाने या ८ चित्त्यांना भारतात आणण्यात आले. चित्त्यांमध्ये ५ मादी आणि ३ नर चित्ते आहेत. भारतातून नामशेष झालेला हा प्राणी पुन्हा आपल्या वातावरणात रुजावा, वाढावा यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.
( हेही वाचा : राज ठाकरेंचे रविवारपासून ‘मिशन विदर्भ’!)
कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांसाठी विशेष सोय करण्यात आली असून याठिकाणी सुरूवातीला त्यांना क्वारंटाईन ठेवण्यात येणार आहे. या पार्कमध्ये चित्त्यांसाठी १२ किमी लांब कुंपण उभारण्यात आले आहे. चित्त्यांना सुरूवातीला या अधिवासात ठेवण्यात येणार आहे.