नेमकी कोणाची ‘थट्टा’ मांडली?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आपल्या गाण्यांमुळे आणि राजकीय टीकांमुळे चांगल्याच चर्चेत असतात. एका वाहिनीवरील मनोरंजक कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर दिलखुलास चर्चा केली. यावेळी त्यांना पिंजरा सिनेमातील हे गाणं ऐकवण्यात आलं. त्यानंतर त्यांना हे गाणं ऐकल्यावर तुमच्या डोळ्यांसमोर कोणाचा चेहरा येतो? असा प्रश्न अमृता यांना विचारण्यात आला, त्यावर अमृता फडणवीस यांनी उत्तर देत उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. अमृता फडणवीस यांच्या या उत्तरानंतर शिवसेना नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांना गाण्यातूनच उत्तर दिलं आहे. अमृता फडणवीस आणि किशोरी पेडणेकर यांच्यातील ही टीकांची जुगलबंदी या आधीसुद्धा अनेकदा दिसून आली आहे. पण ही सांगितिक टीकांची जुगलबंदी सगळ्यांना खळखळून हसवणारी आहे, असंच म्हणावं लागेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here