आझादीच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतमातेला अनोखी मानवंदना

87

पूर्वाश्रमीचे गिर्यारोहक रमाकांत महाडिक हे उतार वयातही तरुणांना लाजवेल अशा धाडसी मोहिमेवर आहेत. आझादीचा अमृत महोत्सव सुरु आहे. त्यानिमित्ताने भारतमातेला वंदना करण्याच्या उद्देशाने महाडिक एका अनोख्या मोहिमेवर आहेत. सध्या ते देशाचा सागरी किनारा सायकलने पार करण्याचे ध्येय बाळगून मोहिमेला निघाले आहेत. कच्छपासून सुरु झालेला त्यांचा हा प्रवास मुंबई, कन्याकुमारी करत पुढे अंदमानला संपणार आहे. त्या प्रवासात महाडिक शनिवारी, १५ जानेवारी रोजी मुंबई येथे आले असता त्यांनी आवर्जून स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट दिली आणि वीर सावरकर यांचे दर्शन घेतले. महाडिक यांनी हिमालय, अरुणाचल प्रदेश आणि सह्याद्री रंगातील पर्वतांची यशस्वी चढाई केली आहे.

रमाकांत महाडिक यांचा काय आहे मनोदय?

याविषयी बोलताना रमाकांत महाडिक म्हणाले की, दक्षिणेपासून कन्याकुमारीपर्यंत अरबी समुद्र लाभलेला आहे. कन्याकुमारीला दक्षिणेकडे हिंद महासागर आणि पूर्व किनारपट्टीवर कोलकत्ता ते अंदमानपर्यंत बंगाल उपसागर आपल्या भारताला लाभलेला आहे. हे सागर जणू भारतमातेचे चरण धूत आहेत. किनाऱ्यावर विविध प्रांत, भाषा, संस्कृतीने नटलेल्या ‘अनेकता मै एकता’ अशा या भारतमातेला सायकलने ६,८०० किमी गवसणी घालण्याचा मी प्रयत्न करणार आहे. स्वतंत्र भारतात ६८ वर्षे जगलो, फुललो, आझादीच्या अमृत महोत्सवानिमित्ताने सायकलिंगचे ६८ शतकी किमी पूर्ण करण्याचे ठरवले आहे. १ जानेवारी २०२२ रोजी कटेश्वरला सूर्यास्ताचे दर्शन घेऊन प्रवासाला सुरुवात केली. आता हा प्रवास स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांच्या जुलमी काळ्यापाण्याची शिक्षा भोगलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांना २६ फेब्रुवारी रोजी त्यांच्या पुण्यतिथीला आदरांजली वाहणार आहे, असा मनोदय रमाकांत महाडिक यांनी व्यक्त केला.

(हेही वाचा वीर सावरकर यांचे विचार चिरंतन, कालातीत! प्रवीण दीक्षितांनी सावरकर युगाचा घेतला मागोवा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.