शनिवारी गोवंडी बैगनवाडी येथे बेस्ट बस व ट्रकचा अपघात झाला. बैगनवाडी सिग्नलजवळ सिमेंटचा ट्रक पलटी झाल्यामुळे बेस्ट बस ट्रकला धडकली परंतु चालकाच्या प्रसंगावधानामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
बेस्ट बसच्या पुढच्या बाजूस सिमेंटने भरलेला ट्रक उलटला, तर मागच्या बाजूने सुद्धा दुसऱ्या एका ट्रकने बसला धडक दिल्यामुळे बैगनवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. परंतु चालकाने वेळीच बसला कंट्रोल केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
( हेही वाचा : पश्चिम व मध्य रेल्वेच्या सुविधांमध्ये भेदभाव का? )
पहा व्हिडिओ
गोवंडी येथे बेस्ट बस व ट्रकचा अपघात@myBESTBus #bestbus #ACCIDENT @CPMumbaiPolice pic.twitter.com/L0ZkbapQ2U
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) May 7, 2022