कारवाईमुळे झाला मार्शलच्या जीवाशी खेळ

विनामास्क फिरणा-यांवर कारवाई करणा-या महापालिकेच्या मार्शलच्या जीवाशी खेळ झाल्याची घटना सांताक्रुझ परिसरात घडली आहे. विनामास्क गाडी चालवणा-या कॅब ड्रायव्हरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या मुंबई महापालिकेच्या मार्शलला मुजोर कॅब ड्रायव्हरने कारच्या बोनेटवरुन फरफटत नेले. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

विनामास्क रस्त्याने फिरणा-या नागरिकांवर मुंबई महापालिकेच्या मार्शलकडून दंडात्मक कारवाई करण्यात येते. अशाप्रकारे विनामास्क गाडी चालवणा-या कॅब चालकाची या मार्शलने अडवणूक केली. त्यावेळी या कॅब चालकाने दंड देण्यास नकार देत गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गाडीसमोर येऊन त्याची अडवणूक करण्याचा प्रयत्न मार्शलकडून करण्यात आला. त्यावेळी मुजार चालकाने गाडी पुढे नेत मार्शलला बोनेटवर बसवून फरफटत नेले. याबाबतची अतिरिक्त माहिती अजूनही समोर आलेली नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here