भिवंडीत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडी व परिसरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून प्रशासन याची दखल घेत नाही. भिवंडी शहर हे ट्रान्सपोर्ट हब म्हणून ओळखले जाते, तिथे जवळपास सर्वच नामांकित कंपन्यांची गोदामे आहेत, जिथे वाहतूक मोठ्या प्रमाणात होते, परंतु या खड्ड्यांमुळे वाहतूक चालकांची अवस्था बिकट झाली आहे. या खड्ड्यांमधून मार्ग कसा काढायचा असा प्रश्न वाहतूक चालकांना पडला आहे. यासंदर्भात एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यात एक बस ड्रायव्हर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संबोधित करताना, साहेब प्लीझ तुम्ही या भिवंडीवर लक्ष द्या आणि हे खड्डे बुजवा अशी विनंती करतानाचा बस ड्रायव्हरचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
( हेही वाचा : फिरायला जाताय? ‘या’ जिल्ह्यात ट्रेकिंगसह कॅम्पिंगला बंदी; वनविभागाने पर्यटकांना जारी केल्या सूचना)