थोबाड फोडीन वरुन चित्राताईंची महापौरांना शाब्दिक चपराक

महिलांवरील अत्याचारावरुन राज्यातील राजकीय वादळ शांत न होता ते आणखीच रौद्ररुप धारण करत आहे. भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये यावरुन आरोप-प्रत्यारोपांची खडाजंगी सुरू असतानाच यात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी उडी घेतली आहे. बोरीवली येथील भाजपाच्या नगरसेविका अंजली खेडकर यांच्या कार्यालयात बोलावून महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न भाजपाच्याच वॉर्ड अध्यक्षांनी केला. त्यामुळे या वॉर्ड अध्यक्षांना तातडीने अटक करावी, तसेच महिलेस मारहाण करणाऱ्या भाजपा पदाधिकाऱ्यास अटक करावी, या मागणीसाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने परिमंडळ ११ चे उपायुक्त यांची बोरीवली पोलिस ठाण्यात जाऊन भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी भाजपाच्या महिला नेत्यांना महिलांवरील अत्याचारावरुन जाब विचारला. त्याला तितकंच ठोस प्रत्युत्तर भाजपाच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी दिले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here