डोंबिवलीच्या सावळाराम कोविड सेंटर मध्ये दारू-गांजा पार्टी!

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. असे असताना व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

कल्याण डोंबिवली शहरात वाढत्या कोरोना रुग्णसंख्यामुळे महापालिका चिंतेत आहे. पण दुसरीकडे मात्र कोविड सेंटरमधील कर्मचारी कोविड सेंटरमध्येच दारू आणि गांजाच्या पार्टीत रंगले असल्याचे पहायला मिळत आहे. या पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर, महापालिकेने या कर्मचाऱ्यांवर कारवाई करुन कामावरुन काढून टाकले आहे. मात्र व्हायरल झालेल्या या व्हिडिओची चर्चा संपूर्ण कल्याण डोंबिवलीत मोठ्या प्रमाणात सुरू होती.

कोविड सेंटरमध्ये दारू, चरस आणि गांजा

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. असे असताना व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. केडीएमसीच्या डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुल येथील कोविड सेंटरमधील काही कर्मचारी, कोविड सेंटर येथे शनिवारी दारूची पार्टी करत होते. या पार्टीत केवळ दारूच नाही तर गांजा, चरस देखील ओढत होते. यादरम्यान येथील एका तरुणाने त्यांना पार्टी करण्यास मज्जाव केला व या पार्टीचे मोबाईलमध्ये चित्रण केले म्हणून, पार्टीतील कर्मचा-यांनी त्या तरुणालाच मारहाण केली.
या पार्टीचा व्हिडिओ रविवारी व्हायरल होताच या कर्मचाऱ्यांवर कारवाई करून कामावरून काढून टाकण्यात आले असल्याची माहिती महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे.

कर्मचारी महापालिकेचे नाहीत

याबाबत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी डॉ.पान पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, सावळाराम येथील कोविड रुग्णांची व्यवस्था बघणारे तसेच रुग्णावर उपचार करणारे केडीएमसीचे कर्मचारी व डॉक्टर नाहीत. ही व्यवस्था वन रुपी क्लिनिककडे असून तेथील कर्मचारी, डॉक्टर हे वन रुपी क्लिनिकचे असल्याची माहिती डॉ. पान पाटील यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here