नाशकात ड्रोनद्वारे सॅनिटायझरची फवारणी!

ड्रोनची 12 लिटर सॅनिटायझरची टाकी असून तब्बल 1 एकर क्षेत्रावर एकावेळी फवारणी करता येऊ शकते, असे खासदार हेमंत गोडसे यांनी म्हटले आहे.

168

नाशिकमध्ये ड्रोनच्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावर सॅनिटायझरची फवारणी करण्यात येत आहे. बंगळुरू गरुडा एरोस्पेस या कंपनीच्या माध्यमातून नाशिकमध्ये हा प्रयोग करण्यात येत आहे. सुरुवातीला शहरातल्या हॉटस्पॉट असलेल्या 13 ठिकाणी फवारणी करण्यात येणार असून हा प्रयोग यशस्वी झाल्यास संपूर्ण शहरात हा प्रयोग राबवला जाणार आहे. या ड्रोनची 12 लिटर सॅनिटायझरची टाकी असून तब्बल 1 एकर क्षेत्रावर एकावेळी फवारणी करता येऊ शकते, असे खासदार हेमंत गोडसे यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा : सांभाळा… मुंबईत म्युकरमायकोसीसचे १११ रुग्ण!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.