स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका होत आहे. याप्रकरणी आता अमरावती जिल्ह्यातील आमदार रवी राणा यांनीही उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलं आहे. देशविरोधी वक्तव्य करणारे राहुल गांधी आणि त्यांना समर्थन देणारे उद्धव ठाकरे या दोघांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा अन्यथा मी आंदोलन करेन असा इशारा रवी राणा यांनी दिला आहे.
( हेही वाचा : पश्चिम रेल्वेकडून मुंबईकरांना गिफ्ट, तर मध्य रेल्वेवर शनिवारपासून २७ तासांचा मेगाब्लॉक!)