कांद्याच्या धुराने डोळ्यात आणले पाणी!

कांद्याने घेतला पेट,,, आणले डोळ्यात पाणी… ही वाक्य आपम कांदा महाग झाल्यानंतर अनेकदा ऐकली असतील. पण लासलगाव येथे कांद्याने खरचं पेट घेतला आहे. त्यामुळे कांदा निर्यातदा-याच्या डोळ्यात पाणी आले आहे. लासलगाव येथील निर्यातदार कांदा व्यापारी कांतीलाल सुराणा यांचे लासलगाव-विंचूर रोड वर कांद्याचे मोठे गोडाऊन आहे. त्या ठिकाणी ठेवलेले लाखो रुपयांचे बारदान आगीत जळून खाक झाल्याची घटना दुपारी दीड वाजता घडली. आग इतकी भीषण होती की धुराचे मोठमोठाले लोळ उठत होते. तिथे काम करणा-या मजूरांना आगीच्या तोंडातून वाचवण्यात यश आले आहे. आग लागल्याचे समजताच मजूर वर्गाने पळ काढल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here