घोडेबाजार चालवण्याची आघाडी सरकारची परंपरा!

161

प्रशासनात आपल्याच मर्जीतले-ताटाखालचे अधिकारी बसवून, त्याच्या मार्फत ब्लॅक लिस्टेट कंपन्यांना आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षा कंत्राटं द्यायची, जेणेकरुन पदभरतीमध्ये वसूलीचा घोडेबाजार चालवण्याची आघाडी सरकारची परंपरा राखता आली पाहिजे. आरोग्यमंत्र्यांचे हे कारनामे आरोग्य विभागाच्या पदभरती घोटाळ्यामुळे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहेत. असा, आरोप भाजपनेते गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. सगळ्या घोटाळेबाजीला राज्य सरकारचंच अभय होतं का? असा सवाल उपस्थित होतोय. आरोग्य मंत्र्यांचा व घोटाळेबाजाचा संबंध नेमका काय आहे ? हे जनतेला कळालं पाहिजे. हे प्रकरण म्हणजे सगळी यंत्रणाच पोखरलेली आहे, या गंभीर घोटाळ्याची आरोग्य मंत्र्यांसहीत न्यायलयीन चौकशी झालीच पाहिजे राज्य सरकारने जर, याबाबत टाळाटाळ केली तर आम्हीच हा घोटाळा सीबीआयकडे घेऊन जाऊ. असा इशारा पडळकरांनी सरकारला दिला आहे.

( हेही पहा : क्लीन अप मार्शलची संपणार दादागिरी )

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.