केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील मलमपुझा टेकडीवर 23 वर्षीय गिर्यारोहक चेराट्टील बाबू पाय घसरल्याने तब्बल 40 तास एका कड्यावर अडकला. त्याचे प्राण वाचवण्यासाठी सेना दलाच्या जवानांनी आपल्या प्राणांची बाजी लावली आणि त्याचे प्राण वाचवले. या घटनेचा व्हिडिओ कॅमे-यात कैद झाला असून, सर्वच स्तरांतून सेना दलाच्या जवानांचे कैतुक करण्यात येत आहे. त्या तरुणाचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती, अशीच प्रतिक्रिया सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.
Join Our WhatsApp Community