पुणे – पानशेत या मार्गावर दरड कोसळल्यामुळे याभागातील वाहतूक ठप्प झाली असून यामुळे एकूण ३० गावांचा संपर्क तुटला आहे. ओसाडे आणि सोनपूर या गावांच्या सीमेवरील डोंगर उतारावर ही दरड कोसळल्यामुळे याचा फटका वाहतुकीला बसला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सध्या दरड हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सध्या नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवास आहेत. घाट रस्त्याच्या परिसरात दरडींचा धोका अधिक दिसून येत आहे. नागरिकांनी अशा ठिकाणांहून प्रवास करणे टाळावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
( हेही वाचा : WiFi चा वापर करण्यात मध्य रेल्वेचे हे स्थानक आघाडीवर! CSMT स्थानकालाही टाकले मागे )
Join Our WhatsApp Community