राज्यात लॉकडाऊनचा पहिल्या दिवसातच फज्जा उडाला. सर्वसामान्यांची रस्त्यावर वर्दळ सुरु होती. १५ एप्रिल रोजी पहिल्या दिवशीच सकाळी १० वाजता दहिसर टोल नाक्याकडे प्रचंड वाहतूक कोंडी हाती. तिथे मुंबईत अनावश्यक येणाऱ्या वाहनांची गर्दी झालेली होती. दुपारी १ वाजता पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या नातलगांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रेमडीसीव्हीर इंजेक्शनसाठी धरणे आंदोलन केले. तर सायंकाळी ७ वाजता शिवाजी पार्क येथे नागरिक बिनधास्तपणे जॉगिंग करतांना दिसत होते. विशेष म्हणजे त्यावेळी पोलिस स्वतः तिथे उपस्थित होते.
(हेही वाचा : हरिद्वारमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव: निरंजनी आखाड्याने कुंभमेळा संपल्याची घोषणा )
Join Our WhatsApp Community