हिंगोलीत पूरस्थिती; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिल्लीतून थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन

हिंगोली जिल्ह्यातील आसना नदीला पूर आल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांची व्यवस्था करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. आसना नदीला पूर आल्यामुळे अनेक घरे पाण्याखाली गेलेली आहेत. नदीला पूर आल्यामुळे संपूर्ण कुरुंदा गाव पाण्याखाली गेले आहे. दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही बाब कळताच त्यांनी स्वतः दिल्लीवरून हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधून पूरपरिस्थितीचा आढावा घेतला यावेळी त्यांनी स्वतः पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या जेवणाची राहाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. तसेच पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी एनडीआरएफ (NDRF) पथके पाठवण्याची सूचना केली आहे काही कमी जास्त लागल्यास स्वतः कळवावे असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

( हेही वाचा : विमानतळ प्रवाशांसाठी ‘बेस्ट’ सेवा! या मार्गावर सुरू होणार वातानुकूलित बस)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here