राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी सरकारवर हल्ला चढवला आहे. आमदार रवी राणा यांनी शेतक-यांची फसवणूक झाल्याचे सांगत सरकारवर आगपखड केली आहे. महाबीजचे बोगस बियाणे देऊन सरकारने शेतक-यांची फसवणूक केली आहे, त्यामुळे याबाबत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार रवी राणा यांनी केली आहे. तसेच त्यांनी दोन दिवसांच्या अधिवेशनाचा निषेध करत अधिवेशनाची कार्यक्रम पत्रिका फाडून टाकली.