भोंग्यांच्या मुद्द्यावरुन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली. या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गैरहजेरी लावली. भोंग्यांच्या मुद्द्यावर मनसे ठाम असून राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नियमावली तयार करावी. अन्यथा आम्ही आमच्या अल्टिमेटमवर ठाम असून आम्ही हनुमान चालिसा लावणार म्हणजे लावणार असा थेट इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे.