तुम्हाला हनुमान चालिसा नको, आम्हाला भोंगे नकोत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन हनुमान चालिसा पठण करण्याचे आव्हान केल्यानंतर शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर निदर्शने करत विरोध केला. यावरुन आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना सवाल केलं आहेत. राज्यात मुख्यमंत्र्यांना जो न्याय आहे तोच राज्यातील जनतेला सुद्धा असायला हवा. त्यामुळे जर मुख्यमंत्र्यांना जर आपल्या घराच्या बाहेर हनुमान चालिसा नको असेल, तर आम्हाला देखील आमच्या घराबाहेर भोंग्यांवरची अज़ान नको आहे, त्यामुळे आम्हाला न्याय कधी मिळणार, असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here