रस्ते आणि रेल्वे वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी करुन प्रवासी जलवाहतूक सेवा सुरु करण्यासाठी बेलापूर येथे बांधण्यात आलेल्या प्रवासी जेट्टीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यामुळे बेलापूर ते मुंबई प्रवास अवघा ३० मिनिटांत पूर्ण होणार आहे.
( हेही वाचा : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, जाणून घ्या हॉलतिकीट कसं मिळणार )
वॉटर टॅक्सी सेवा
बेलापूर येथून प्रत्येकी १० ते ३० प्रवासी क्षमता असलेल्या ७ स्पीडबोटी आणि ५६ प्रवासी क्षमता असलेली एक कॅटामरान बोट अशा एकूण ८ बोटींद्वारे ही वॉटर टॅक्सी सेवा सुरु करण्यात येत आहे. बेलापूर येथून दक्षिण मुंबईत भाऊचा धक्का येथे पोहोचण्यास स्पीड बोटीने फक्त ३० मिनिटे तर कॅटामरान बोटीला ४५ ते ५० मिनिटांचा कालावधी लागणार आहे. स्पीडबोटीचे भाडे प्रतिप्रवासी ८०० ते १२०० रुपये असून कॅटामरान बोटीकरीता प्रतिप्रवासी २९० रुपये इतके भाडे आकारण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community