चिमुकल्यासमोर वडिलांची धारदार कोयत्याने हत्या! पिंपरी-चिंचवड हादरले

पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. भर रस्त्यात एका व्यक्तीवर धारदार कोयत्याने सपासप वार करुन त्याला जीवे मारण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी काही तासांतच आरोपीला अटक केली आहे.

कोयत्याने केले वार

चिखली परिसरात रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कानिफनाथ क्षीरसागर या युवकाची कोयत्याने वार करुन निर्घृण हत्या करण्यात आली. धक्कादायक म्हणजे आपल्या अडीच वर्षांच्या मुलासोबत कानिफनाथ आपल्या मित्रासोबत गप्पा मारत होता. त्यावेळी आरोपी असलेल्या आकाश तेथून चालत जात होता. त्यावेळी अचानक आकाशने आपल्या पिशवीतून धारदार हत्यार काढून कानिफनाथच्या डोक्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर कानिफनाथने तिथून पळ काढला पण त्याचा पाठलाग करत आकाशने त्याची हत्या केली. त्यानंतर आरोपी तिथून फरार झाला होता. या घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला तातडीने अटक केली आहे.

(हेही वाचाः मुंबईत १०० किलो गोल्ड पोटॅशियम डायसायनाईड जप्त)

म्हणून केली हत्या

कानिफनाथ आणि आकाश हे दोघेही आधी एकमेकांचे शेजारी होते. त्यावेळी आकाशला दोघांकडून मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीनंतर आकाश आपल्या परिवारासोबत दुस-या ठिकाणी रहायला गेला होता. पण या मारहाणीमागे कानिफनाथचा हात असल्याचा आकाशला संशय होता. त्यामुळे सूड उगवण्यासाठी आकाशने ही हत्या केल्याची माहिती मिळत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here