चाकणकरांची दरेकरांविरोधात पोलिसांत तक्रार

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी एका जाहीर कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालांचे मुके घेणारा पक्ष असल्याचे आक्षेपार्ह विधान केले. त्यानंतर राज्यातील सर्वच राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी दरेकरांचा तीव्र निषेध केला. तरीदेखाल दरेकरांनी माफी न मागता या गोष्टीला आपण इतके महत्त्व देत नसल्याचे सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रुपाली चाकणकर चांगल्याच आक्रमक झाल्या असून दरेकरांनी महिलांचा अपमान केल्याचे म्हणत पोलिस ठाण्यात त्यांच्याबाबत तक्रार दाखल केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here