जेव्हा राडे करायचे असतील त्यावेळी शिवसेनेला शिवसैनिक हवा आणि पद देताना मात्र यांना नातेवाईक दिसतात, असा घणाघाती आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला. हिंदुस्थान पोस्टला दिलेल्या ऑफबीट मुलाखतीमध्ये नितेश राणे यांनी वाझे, हिंदुत्व, ठाकरे सरकारची कामगिरी अशा अनेक मुद्यांवर भाष्य करत ठाकरे सरकारवर प्रहार केला. यावेळी त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. मागील आठवड्यात प्रसाद लाड यांनी केलेल्या विधानावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला नितेश राणे यांनी हिंदुस्थान पोस्टच्या मुलाखतीमध्ये सडेतोड उत्तर दिले.
नेमकं काय म्हणाले नितेश राणे?
नातेवाईकांचे सरकार म्हणजे ठाकरे सरकार, असे सांगताना आज यांचा पक्ष पण नातेवाईकांकडे आहे आणि मंत्रालय देखील नातेवाईकांकडे असल्याचा प्रकार पहायला मिळत आहे. आज शिवसेनेचा आणि विशेषत: बाळासाहेब ठाकरे यांचे पूत्र मुख्यमंत्री असताना, मूळ शिवसैनिक कुठे आहे. ज्याने शिवसेनेला उभे केले तो मूळ शिवसैनिक आर्थिक सक्षम किती झाला, असे म्हणत यांना फक्त राडे करायला शिवसैनिक हवा, अशी टीकाच नितेश राणे यांनी केली आहे.
आज प्रत्येक विभागात वाझे
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जे वाझे प्रकरण राज्यात गाजले त्यावरुन देखील नितेश राणे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. मंत्रालयाच्या प्रत्येक विभागात आता वाझे असल्याचे म्हणत मुंबई पालिकेत डिनो नावाचा वाझे असल्याचे आम्ही ऐकल्याचे नितेश राणे म्हणाले. हे वाझे तयार करण्यासाठी प्रवृत्त कोण करत आहे, हे समजून घेणं गरजेच आहे. सचिन वाझे वर्षा बंगल्यावर रहायला जायचा. त्यामुळे सचिन वाझे तयार होतातच कसे? यावर विचार व्हायला हवा, असे नितेश राणे म्हणाले.
Join Our WhatsApp Community