बाह्य स्त्रोताद्वारे (कंत्राटी) पदे भरण्यास महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने तीव्र विरोध केला आहे. या खासगीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने २३ मे पासून राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे. सोमवार २३ मे २०२२ रोजी परिचारिका संघटनेची शाखा सर ज जी समुह रुग्णालय मुंबई येथे परिचारिकांनी एक तास काम बंद आंदोलन व निदर्शने केली. यावेळी परिचारिका एकजुटीचा विजय असो, खासगीकरण बंद करा अशा घोषणा परिचारिकांनी दिल्या आणि खासगीकरणाला तीव्र विरोध दर्शवला. या दरम्यान शासनाने चर्चेसाठी वेळ दिला नाही तर २८ मे २०२२ पासून संपूर्ण राज्यात बेमुदत आंदोलन करण्यात येईल. असा इशारा महाराष्ट्र परिचारिका संघटनेने सरकारला दिला आहे.
( हेही वाचा : Google Pay हे अॅप ओपन न करताच पूर्ण होईल तुमचे पेमेंट; काय आहे हे नवे फिचर)
जे.जे.रुग्णालय मुंबई येथे परिचारिकांचे एक तास काम बंद आंदोलन
Join Our WhatsApp Community