जेव्हा कधी पैशांच्या बाबतीत तुमची फसवणूक केली जाते तेव्हा तुम्ही एक वाक्य नक्कीच म्हणत असाल, ‘पैसे पाण्यात गेले.’ पण पाण्यातून तुम्हाला पैसे मिळाले आणि तुम्ही करोडपती झालात तर?? पालघर जिल्ह्यातील एका मच्छीमाराने समुद्राच्या पाण्यातून असा पाण्यासारखा पैसा कमावला आहे. पालघर जिल्ह्यातील मुरबे गावातील मच्छीमार चंद्रकांत तरे हे राततोरात मालामाल झाले आहेत.पालघरच्या समुद्रात मासेमारी करताना किंमती घोळ मासे त्यांच्या गळाला लागले. ज्यांची किंमत कोट्यावधींच्या घरात आहे.
असे झाले करोडपती
तरे दादा आपल्या मालकीची श्री. साई लक्ष्मी बोट घेऊन खोल समुद्रात १५ मैल अंतरावर आपल्या मित्रांसह मासेमारी करायला गेले होते. तेव्हा त्यांनी समुद्रात टाकलेलं जाळं जड झाल्यासारखे वाटल्याने त्यांनी जाळे बोटीत ओढून पाहिले. त्यात 18 ते 25 किलो वजनाचे जवळजवळ 157 घोळ मासे जाळ्यात अडकल्याचे त्यांच्या लक्षात आले. बाजारात जेव्हा या माशांची बोली लावली जात होती, तेव्हा उत्तर भारतातून आलेल्या एका व्यापारी समूहाने जवळजवळ 1 करोड 33 लाख रुपयांना हे मासे खरेदी केले.
का आहे मासा मौल्यवान?
घोळ माशाच्या पोटातील पिशवी(bot)चा वापर वैद्यकीय वापरासाठी केला जातो. एका माशामध्ये 300 ते 400 ग्राम वजनाची पिशवी मिळण्याचा अंदाज आहे. या घोळ माशांना बाहेरच्या देशांत मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. इंडोनेशिया, थायलंड, हाँगकॉंग, सिंगापूर आणि मलेशिया या देशांमध्ये घोळ माशाला मोठी मागणी आहे. या देशात या माशांना सिया गोल्ड म्हणून ओळखले जाते. या घोळ माशाच्या लिव्हर पासून औषध कंपन्या निरनिराळी औषधे बनवतात. सोबतच दारुच्या शुद्धीकरणासाठीही याचा उपयोग केला जातो.
Join Our WhatsApp Community