राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे दाऊदशी संबंध आहेत, असे विधान माजी खासदार निलेश राणे यांनी केले. त्यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी नितेश आणि निलेश राणे यांच्याविरोधात आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. मोदी शरद पवार आणि अंडरवर्ल्डबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काय बोलत आहेत? ज्यांना समजेल त्यांनी वाचावे बाकिच्यांनी बक बक चालू ठेवावी, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.
(हेही वाचाः कितीही गुन्हे दाखल केले तरी, ‘पवार साहेब हे…’ राणेंच्या ट्वीटमुळे पुन्हा खळबळ)
काय म्हणाले होते मोदी?
दिल्ली आणि मुंबईचं नातं हे खूपच जवळचं आहे. मुंबईत पाऊस पडला तरी दिल्लीत थंडी पडते. मुंबई हे देशाचं आर्थिक केंद्रबिंदू असलेलं शहर आहे. एक दशक असे आले जेव्हा मुंबईला अंडरवर्ल्डने हादरवून सोडले. मुंबई अंडरवर्ल्डच्या हातात गेली तर काय होणार असा प्रश्न त्यावेळी सर्वांना पडला होता. पण शरद पवारांचे कौशल्य आणि हिंमतीच्या जोरावर त्यांनी मुंबईला अंडरवर्ल्डपासून वाचवले, असे नरेंद्र मोदी यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
(हेही वाचाः अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, कारण.)
कधीचा आहे व्हिडिओ?
शरद पवार यांच्या आत्मचरित्राचा अनावरण सोहळा काही वर्षांपूर्वी नवी दिल्ली येथे संपन्न झाला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांचे कौतुक केले होते. त्यावेळचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये शरद पवारांनी अंडरवर्ल्डपासून मुंबईला वाचवले, असे विधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
Join Our WhatsApp Community