‘फ्रेंडशिप डे’ आधीच मैत्रीला तडा!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांनी मित्र प्रसाद लाड यांना विधान परिषदेत जिंकून आणले होते. आज त्याच मित्रांच्या मैत्रीला तडा गेला आहे का, असे चित्र आहे.

147
‘शिवसेनेला वाटते की, आम्ही माहीममध्ये आल्यावर सेनाभवन फोडू, तर त्यांना सांगतो की वेळ आली तर आम्ही सेनाभवन पण फोडू’, असे चिथावणीखोर वक्तव्य प्रसाद लाड यांनी शनिवारी, ३१ ऑगस्ट रोजी केले होते. वाद पेटल्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मी केलेल्या भाषणाचा विपर्यास केला गेला असल्याचे म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र ज्या शिवसेनेवर प्रसाद लाड यांनी टिका केली त्याच शिवसेनेने त्यांना आमदार होण्यासाठी खास मदत केली होती. परंतू प्रसाद लाड यांनी वादग्रस्त वक्तव्य करत ‘फ्रेंडशिप डे’ आधीच मैत्रीला तडा दिला.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.