साडी नेसली म्हणून तिला रेस्टॉरंटमध्ये…

स्त्रीचं सौंदर्य हे साडीत जास्त खुलून दिसतं. मग ती पाचवारी, सहावारी, नऊवारी असो किंवा पैठणी, कांजीवरम, सिल्क असो… जरी ती जरीची नसली तरी कुठल्याही साडीतली स्त्री नभातल्या अप्सरेपेक्षा कमी सुंदर दिसत नाही. साडीचा पदर स्त्रीसाठी असलेला आदर वाढवतो. पण असं हे पारंपारिक वस्त्र सध्याच्या स्मार्ट युगात आऊटडेटेड झाल्याचा अनुभव येत आहे. साडी हे आमच्या रेस्टॉरंटच्या स्मार्ट कॅज्युअलमध्ये येत नसल्याचे सांगत दिल्लीतील रेस्टॉरंटमधल्या ओव्हरस्मार्ट स्टाफने साडी नेसलेल्या महिलेला चक्क प्रवेश नाकारला आहे. त्यामुळे आता भारतीय पारंपारिक कपड्यांना स्मार्ट पोशाखात गणले जातं नाही का असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here