राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना राज्य सरकारने विविध निर्बंध जाहीर केले आहेत. लग्न समारंभ तसेच सार्वजनिक कार्यक्रमात गर्दी न करण्याचे सांगण्यात आले आहे. नाशिक येथे झालेल्या एका लग्नसमारंभात नियमांचे पालन न केल्याने कारवाई करत त्यांच्यावर दंड आकारला. त्यासोबतच नवविवाहित दाम्पत्यांना बोहल्यावरुन उठवले. पण शासकीय कार्यक्रमांत मात्र नियमांचे पालन होताना दिसत नाही. ३१ मार्च रोजी झालेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजनाला सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडालेला दिसला. म्हणजे याचाच अर्थ सर्वसामांन्यांना एक न्याय तर सरकारी कार्यक्रमांसाठी दुसरा न्याय आहे का, असा प्रश्न आता विचारण्यात येत आहे. मग याला जबाबदार कोण?
Join Our WhatsApp Community