कारवाई करायला गेलेल्या महिलेची छाटली बोटे

रस्त्यावर अनधिकृतरित्या विक्री करणा-या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या ठाणे महापालिकेच्या माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या साहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर एका फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात पिंपळे यांची दोन बोटे तुटली असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घोडबंदर रोड येथील कासारवडवली परिसरात कल्पिता पिंपळे सोमवारी सायंकाळी पथकासह फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी या कारवाईला विरोध करणाऱ्या अमरजित यादव या फेरीवाल्याने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात पिंपळे यांची दोन बोटे तुटली, तर त्यांच्या सुरक्षा रक्षकाचेही एक बोट तुटले. या दोघांवर घोडबंदर रोड येथील वेदांत रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत फेरीवाल्याला ताब्यात घेतले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here