शाळांना राज्य सरकारच्या माध्यमातून मिड-डे मील पुरवले जाते. मात्र पुण्यात सध्या लॉकडाऊनमुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना थेट घरीच मिड-डे मील पोहचवले जात आहे. परंतु यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पशुखाद्य पाकिटातून विद्यार्थ्यांना मिड-डे मील पुरवले जात आहे. हे लक्षात येताच स्थानिकांनी याविरोधात संताप व्यक्त करून तक्रार केली. त्याची भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने दखल घेतली आहे, पुण्यातील सरकारी शाळा क्रमांक ५८ मध्ये या प्रकार घडला असून या प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पुण्याचे महापौर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
(हेही वाचा : विवाह, हळदी समारंभासह पबही ठरतात कोरोनाचे स्प्रेडर्स!)
Join Our WhatsApp Community