जेव्हा वाघ विहिरीत पडतो, तेव्हा…

83
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा गावात मोखाड्यात शेतातील विहिरीत वाघ पडल्याचे दिसून आले. विहिरीची उंची जास्त असल्याने वनविभागाने दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर वाघाला विहिरीतून बाहेर काढले. परंतु बघ्यांच्या गर्दीने अगोदरच भेदरलेल्या वाघाने विहिरीतून बाहेर येताच जंगलात धूम ठोकली.

वाघाला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी पलंग टाकला

सोमवारी सकाळीच शिरपाते या शेतकर्‍याला आपल्या शेतातील विहिरीत वाघ पडल्याचे दिसताच त्यांनी पोलिसांना आणि वरोरा वनविभागाला वाघाची माहिती दिली. मात्र विहिरीजवळ जमलेल्या गर्दीने वाघ चांगलाच भेदरला होता. त्यामुळे पोलिसांनी गर्दीला आवरते घेतल्यानंतरच वनअधिकार्‍यांना बचावाचे काम सुरु करता आले. वाघाला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी चक्क विहिरीत दोरीच्या साहाय्याने पलंग टाकण्यात आला. वाघाच्या मानेलाही दोर टाकण्यात आला. वाघ पलंगावर येताच त्याला पाण्याच्या बाहेर थोडा वेळ तसेच ठेवले गेले, अशी माहिती वनविभाग ( प्रादेशिक ) उपवनाधिकारी आणि साहाय्यक वनसंरक्षक दिपेश मेहता यांनी दिली. भक्ष्याचा पाठलाग करताना वाघ रात्रीच्या वेळेत जमिनीलगतच्या विहिरीत पडला असावा, कित्येक तास वाघ पाण्यातच राहिल्याने विहिरीबाहेर काढल्यानंतर त्याच्या शरीराचे तापमान पूर्ववत करण्यासाठी त्याला पलंगावरच ठेवले गेले. त्यानंतर पलंग बाहेर काढला आणि वाघ थेट जंगलातच पळून गेला, असे मल्होत्रा म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.