व्यापा-यांनी टाळेबंदीलाच ठोकले ‘टाळे’!

राज्यात ब्रेक दि चेन मोहिमेंतर्गत राज्य सरकराने मिनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामध्ये कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. मोठी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. याचा मोठा फटका राज्यातील व्यापारी वर्गाला बसत आहे. आधीच लॉकडाऊनमुळे व्यापा-यांची आर्थिक गणितं बिघडलेली असाताना, आता पुन्हा दुकाने बंद ठेवणं त्यांना परवडणारे नाही. त्यामुळे व्यापा-यांनी रस्त्यावर उतरत लॉकडाऊनचा निषेध केला आहे. नाशिक, नागपूर आणि पुणे इथल्या व्यापरी आंदोलनाची ही एक झलक

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here