वारकऱ्यांचा ट्रक उलटला, ३० वारकरी जखमी

रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सांगली नागज फाट्याजवळ विठ्ठलवाडी परिसरात भीषण अपघात झाला आहे. या मार्गावर रस्त्याचे काम सुरू होते. रस्त्यावर खड्डे असल्याने याठिकाणी वारकऱ्यांचा ट्रक उलटला. या ट्रकमध्ये सुमारे ५० लोक होते. यातील ९ जण गंभीर असल्याची माहिती मिळत आहेत. जखमींना कवठेमहाकाळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी कवठेमहाकाळ पोलीस दाखल झाले आहेत. हे वारकरी कर्नाटक भागातील रहिवासी आहेत. चालकाने जोरात ब्रेक दाबल्याने रस्त्यातल्या खड्ड्यातून ट्रक उलटला आहे.

( हेही वाचा : ३० लाख लोक बेघर, ९३७ जणांचा मृत्यू; पाकिस्तानात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here